MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
आधुनिक भारतीय परराष्ट्र धोरणाचा इतिहास १९व्या शतकाच्या उत्तरार्धापासून होतो आहे. या इतिहासाची विभागणी तीन कालखंडांमध्ये करता येते. स्वातंत्र्यपूर्व कालखंड, स्वातंत्र्योत्तर कालखंड आणि शीतयुद्धोत्तर कालखंड, प्रस्तुत पुस्तकामध्ये या तीन कालखंडांमध्ये घडून आलेल्या भारतीय परराष्ट्र धोरणाच्या विकासाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. शीतयुद्धोत्तर कालखंडामध्ये परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये महत्त्वाचे बदल घडून आले. भारत एकीकडे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. या दोन्ही उद्दिष्टांचा परराष्ट्र- धोरणावर परिणाम घडून आला आहे. शीतयुद्धोत्तर काळात घडून आलेल्या या परिवर्तनाचे चिकित्सक विवेचन करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. पुस्तकाची विभागणी दहा भागांमध्ये करण्यात आली आहे. त्यामध्ये ७१ लेखांचा आणि ४५ तक्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. सन १८८५ पासून ते २००७ पर्यंत भारतीय परराष्ट्र- धोरणक्षेत्रात घडून आलेल्या सर्व महत्त्वपूर्ण घडामोडींची चर्चा या पुस्तकात आढळते. परराष्ट्र- धोरणाचे अभ्यासक, संशोधक, पत्रकार, तसेच स्पर्धापरीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या- साठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.
Similar products