MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्माचे धोर उपासक, बौद्धधर्म प्रवर्तक व महान बोधीसत्व होते, तसेच ते बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञ, विद्वान, लेखक व पुनरूत्थानक होते. एकेकाळी भारतातून लूप्त झालेला बौद्ध धर्म डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा पुनर्जीवीत केला. ३० मे १९३६ रोजी जातपात मोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात 'अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल' असे प्रतिपादन केले. म्हणजेच बुद्ध धर्म स्वीकारण्याचा विचार इ.स. १९३६ पूर्वीच निश्चित झाला असल्याचे दिसून येते. धर्मांतराने बौद्ध धर्मातील आंबेडकरांच्या तर्क, नैतिकता आणि न्यायाच्या जटिल आवश्यकता पूर्ण केल्या आहेत असे मानले जाते. एप्रिल-मे १९५० च्या महाबोधीमध्ये बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भवितव्या या लेखात डॉ. बाबासाहेब म्हणाले, "जग जर कोणता धर्म स्वीकारू शकेल तर तो बौद्ध धर्म होय". 1956 मध्ये, त्यांनी त्यांचे अंतिम कार्य, 'द बुद्ध अँड हिज धम्म' पूर्ण केले, जे मरणोत्तर प्रकाशित झाले.
Similar products